महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये - जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसून तरीही खबरदारी म्हणून जिल्ह्यात 'आपत्ती व्यवस्थापन कायदा' लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, कौटुंबिक कार्यक्रमही मर्यादित करावेत, देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्यावी. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असून घाबरून न जाता सतर्क राहण्याचे व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

पालघर
पालघर

By

Published : Mar 13, 2020, 3:03 PM IST

पालघर - जगभरात सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले असून, पालघर जिल्ह्यात आतापर्यंत वसई-विरार महानगरपालिका हद्दीत परदेशातून प्रवास करून आलेल्या 16 जणांची तसेच ग्रामीण भागातील 12 जणांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, यापैकी कोणत्याही परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळून आलेली नाहीत. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसून तरीही खबरदारी म्हणून जिल्ह्यात 'आपत्ती व्यवस्थापन कायदा' लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, कौटुंबिक कार्यक्रमही मर्यादित करावेत, देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्यावी. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असून घाबरून न जाता सतर्क राहण्याचे व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

पालघर
ज्या व्यक्तीला संसर्गाची बाधा झाली त्या व्यक्तीस विलगीकरण कक्षात (आयसोलेशन) उपचारासाठी ठेवण्यात येते. कोरोनाच्या संशयित रुग्णांना अलगीकरण (क्वॉरेंटाईन) या ठिकाणी निरीक्षणासाठी ठेवण्यात येते. अलगीकारणासाठी वसई -विरार महानगरपालिकेच्या हद्दीत 200 व्यक्तींची क्षमता असलेली जागा उपलब्ध झाली असून ग्रामीण भागासाठी 85 क्षमता असलेले ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. विलगीकरणासाठी शहरी भागामध्ये 28 तर ग्रामीण भागात 40 व्यक्तीच्या क्षमता असलेले रुग्णालय उपलब्ध आहेत.अलगलीकरणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णालयांची क्षमता - टीमा रुग्णालय, बोईसर- 40, ग्रामीण रुग्णालय पालघर-10, जव्हार रुग्णालय-10, प्राथमिक आरोग्य केंद्र एडवन-20, उपकेद्र शेवते-10, उपकेंद्र हिरडपाडा जव्हार -10, डोलारपाडा तलासरी- 05, फुलपाडा वसई-200.

विलगीकरणासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची क्षमता - ग्रामीण रुग्णालय पालघर-10, उपजिल्हा रुग्णालय डहाणू -10, उपजिल्हा रुग्णालय जव्हार -10, उपजिल्हा रुग्णालय वाडा -10, उपजिल्हा रुग्णालय वैतरणा वसई- 20, उपजिल्हा रुग्णालय बोळींज विरार- 8

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा -

पालघर जिल्हा मुंबई शहराजवळ असल्यामुळे अनेक पर्यटक पालघर जिल्ह्यामार्गे प्रवास करतात, अथवा वास्तव्यास असतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात हा कायदा लागू करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कांचन वाणेरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण, औद्योगिक विभाग तसेच सेवाभावी संस्था यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून दैनदिन अहवाल सादर करण्यात येणार आहे.

हेही वाचा -काम न करता शासकीय निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार - अजित पवार

आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत, संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था, स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणे, जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. हा कायदा लागू केल्यामुळे आवश्‍यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्‍टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. खाजगी रुग्णालयांनी सहकार्य करीत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत.

जिल्ह्यात विविध यात्रेनिमित्त जमणाऱ्या जनसमुदायमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये. यासाठी मोखाडा येथे बोहाड यात्रा व विक्रमगड येथील मौजे वेहेलपाडा रद्द करण्यात आली आहे. जनतेमध्ये भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये. म्हणून व्यापक प्रचार, प्रसिध्दी, जनजागृती केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावात माध्यमातून जागृती केली जात असून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आजारासंबंधी प्रबोधनपर फलक, होर्डीग लावण्यात आले आहेत. चित्रपटगृह, केबल नेटवर्कद्वारे माहिती दिली जात आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, मॉल्स, हॉटेल्स, बँक, एटीएम आदी ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावं, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तात्काळ कारवाई करण्याचे सूचना संबधित विभागाला देण्यात आल्या असून, सेवाभावी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. पोलीस यंत्रणेने समाज माध्यमातून अफवा अथवा गैरसमज पसरविणारेशोधून त्यांच्यावर कडक कारवाई व सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांचे प्रबोधन करण्याचे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details