नालासोपारा(पालघर)- बंद घर पाहून चोरी करण्याचा चोराचा डाव फसला आहे. परिसरातील नागरिकांनी चोराला रंगेहात पकडले असून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. नालासोपारा तुळींज येथे हा प्रकार घडला आहे.
शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली चोरी.. रंगेहात चोर पोलिसांच्या स्वाधीन - नालासोपारा चोरी
नालासोपारा पूर्वेकडील काजूपाडा येथील दत्ता चाळीतील बंद रुम पाहून चोराने चोरीचा डाव आखला. रुमचा दरवाचा, खिडकी तोडून चोराने रुममध्ये प्रवेश केला. दरम्यान, दरवाजा तोडतानाचा आवाज परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ऐकायला गेला. नागरिक काय वाजत आहे हे पाहण्यासाठी बाहेर आले असता त्यांना चोर शिरलेली रुम दिसती.
शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली चोरी..