पालघर- मनोर बाजारपेठेत आज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे 3.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरटे दुकानाचे शटर तोडून जयश्री किराणा या होलसेल दुकानात शिरले. दुकानातील रोख रक्कम, किराणा माल असा एकूण 1 लाख 25 रुपयांचा मुद्देमाल घेऊन हे चोरटे पसार झाले आहेत.
मनोरमध्ये किराणा दुकानात सव्वा लाखाची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद - मनोरमध्ये किराणा दुकानात चोरी
दुकानातील रोख रक्कम, किराणा माल असा एकूण 1 लाख 25 रुपयांचा मुद्देमाल घेऊन हे चोरटे पसार झाले आहेत. चोरीची ही घटना दुकान परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मनोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मनोरमध्ये किराणा दुकानात सव्वा लाखाची चोरी
चोरीची ही घटना दुकान परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मनोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पालघर - मनोर रस्त्यावरील दुकानात ही चोरी झाली आहे.