पालघर - सुर्योदय शिक्षण संस्थेच्या उर्से येथील पा. ना. कोरे विद्यालयात चोरी झाल्याची घटना घडली. शाळेतील टीव्ही, ईन्व्हर्टर बॅटरी व रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे.
सुर्योदय शिक्षण संस्थेच्या पा. न. कोरे विद्यालयात चोरी; टीव्ही, ईन्व्हर्टरसह रोख रक्कम लंपास - सूर्योदय शिक्षण संस्थेच्या पा. न. कोरे विद्यालयात चोरी
सुर्योदय शिक्षण संस्थेच्या उर्से येथील पा. ना. कोरे विद्यालयात चोरी झाल्याची घटना घडली.
पा. न. कोरे विद्यालयात चोरी
शाळेचे कार्यलय आणि ई-लर्निंग रूमचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले व रूममधील टीव्ही स्क्रीन, ईन्व्हर्टर बॅटरी त्याचबरोबर काही रक्कम चोरून चोरटे पसार झाले. याप्रकरणी वाणगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत. ग्रामीण भागातही चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.