पालघर- पालघर पूर्व परिसरात चोरट्यांनी तीन घरांचे दरवाजे तोडून 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र व 40 हजार रुपये रोख रक्कम दिवसाढवळ्या लंपास केल्याची घटना घडली आहे.
एकाच इमारतीतील तीन घरांत चोरी, लाखाचा मुद्देमाल लंपास - चोरटे
पालघर पूर्व परिसरात चोरट्यांनी तीन घरांचे दरवाजे तोडून 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र व 40 हजार रुपये रोख रक्कम दिवसाढवळ्या लंपास केल्याची घटना घडली आहे.
पालघर पूर्व इस्कॉन मंदिरच्या पाठीमागे राधिका अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या चोरांनी तीन घराचे दरवाजे तोडून 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र आणि 40 हजार रुपये रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे. चोरी झालेल्या तिन्ही घरातील रहिवासी कामानिमित्त बाहेर गेले असता फ्लॅटमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली आहे. पालघर शहरात दिवसाढवळ्या एकाच इमारतीच्या तीन घरामध्ये चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - .....या कारणामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या अमित घोडा यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे