महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माकुणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी; 2 लाख 60 हजार रुपयांचे ऐवज लंपास - सफाळे पोलीस

चोरट्यांनी मंदिरातून देवीचे सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू व दानपेटीतील रोख रक्कम असा 2 लाख 60 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

माकुणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी

By

Published : Aug 30, 2019, 9:49 AM IST

पालघर - माकुणसार येथील एकविरा देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरट्यांनी मंदिरातून देवीचे सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू व दानपेटीतील रोख रक्कम असा 2 लाख 60 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

माकुणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी

हेही वाचा - वाडा तहसील कार्यालयासमोर कामगारांचे आमरण उपोषण सुरू

ही घटना मध्यरात्री घडली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. याप्रकरणी देवस्थान संस्थेतर्फे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सफाळे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा -पालघर येथे टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैद्य दारुची तस्करी; 13 लाख किमतींचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details