पालघर- 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या नॉटी या श्वानाचा मृत्यू झाला आहे. नॉटीने सोमवारी (१० मे) अखेरचा श्वास घेतला, तो १४ वर्षांचा होता.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'नॉटी' श्वानाचा मृत्यू - 26/11 दहशतवादी हल्ला
निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या नॉटी या श्वानाचा मृत्यू झाला आहे. ब्लॅक लॅब्रेडोर प्रजातीचा 'नॉटी' श्वान ऑगस्ट 2006 मध्ये रेल्वे पोलीस पथकात दाखल झाला. 26/11 हल्ल्याच्या वेळी हा श्वान सीएसटी रेल्वे स्थानकात कार्यरत होता. लष्कर ए तोयबाचा दहशदवादी अजमल कसाब याने लपवलेला शस्त्रसाठा आणि दारुगोळा याच श्वानाने शोधून काढला होता.

ब्लॅक लॅब्रेडोर प्रजातीचा 'नॉटी' श्वान ऑगस्ट 2006 मध्ये रेल्वे पोलीस पथकात दाखल झाला. 26/11 हल्ल्याच्या वेळी हा श्वान सीएसटी रेल्वे स्थानकात कार्यरत होता. लष्कर ए तोयबाचा दहशदवादी अजमल कसाब याने लपवलेला शस्त्रसाठा आणि दारुगोळा याच श्वानाने शोधून काढला होता. या श्वानाने सन 2007-08 च्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी बजावली होती. सन 2017 मधील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ) तर्फे आयोजित केलेल्या स्पंधन-2017 या स्पर्धेत 'नॉटी' ला 'ब्रेवहार्ट' पारितोषिक देण्यात आले होते. याखेरीज अनेक स्पर्धांमध्ये त्याने पारितोषिके मिळविली होती.