महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नारळाचे झाड रिक्षावर कोसळले; रिक्षाचालक थोडक्यात बचावला - पालघर/विरार

कोरोना संक्रमणानंतर वसई-विरारमधील रिसॉर्टना ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र अशा घटनांमुळे रिसॉर्टमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणी आला आहे. दोन वर्षांपूर्वी एका रिसॉर्टमध्ये लहान मुलाचा बुडून मृत्यू झाल्यानंतरदेखील वसई-विरारमधील रिसॉर्ट चर्चेचा विषय ठरली होती.

नारळाचे झाड रिक्षावर कोसळले
नारळाचे झाड रिक्षावर कोसळले

By

Published : Jul 31, 2021, 3:57 PM IST

पालघर/विरार - दैव बलवत्तर असेल तर मृत्यूच्याही दाढेतून परत येता येते. अशाच काहीशा विश्वासाचा प्रत्यय सध्या वसई-विरारकर घेत आहेत. विरार अर्नाळा येथील रिसॉर्टमध्ये भाडे घेण्यासाठी गेलेल्या एका रिक्षावर नारळाचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. मात्र या दुर्घटनेत रिक्षाचालक थोडक्यात बचावला आहे. ही अनपेक्षित घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून सध्या प्रचंड व्हायरला होत आहे.

रिक्षाचालक थोडक्यात बचावला

विरार येथील बंड्या नामक रिक्षावाला सोमवारी संध्याकाळी विसावा रिसॉर्टमधून भाडे घेण्याकरता गेला होता. रिसॉर्टच्या समोरच आपली रिक्षा पार्क करून रिक्षातून बाहेर पडत नाही, तोच त्याच्या रिक्षावर नारळाचे झाड कोसळले. या अनपेक्षित घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने रिसॉर्टमध्ये व घटनास्थळी जास्त पर्यटक नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान रिक्षाचालकाला भरपाई म्हणून सहा हजार रुपये दिले असल्याची माहिती रिसॉर्ट मालकाने दिली आहे.

कोरोना संक्रमणानंतर वसई-विरारमधील रिसॉर्टना ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र अशा घटनांमुळे रिसॉर्टमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणी आला आहे. दोन वर्षांपूर्वी एका रिसॉर्टमध्ये लहान मुलाचा बुडून मृत्यू झाल्यानंतरदेखील वसई-विरारमधील रिसॉर्ट चर्चेचा विषय ठरली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details