पालघर - वाघाडी येथील भीमबांध येथे अंघोळीसाठी सूर्या नदीत गेलेली एक मुलगी बुडाली होती. तब्बल 19 तासांनी तिचा मृतदेह हाती लागला आहे. उजा दीपक गवई (वय - १६, रा. पिंपरी, जिल्हा बुलढाणा) असे मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली.
सूर्या नदी पात्रात बुडालेल्या उजाचा मृतदेह तब्बल 19 तासांनंतर सापडला - kasa
वाघाडी येथील भीमबांध येथे अंघोळीसाठी सूर्या नदीत गेलेली एक मुलगी बुडाली होती. तब्बल 19 तासांनी तीचा मृतदेह हाती लागला आहे.
सूर्या नदी पात्रात बुडालेल्या उजाचा मृतदेह तब्बल 19 तासांनंतर सापडला
उजा आणि तिच्या दोन मैत्रिणी अंघोळीसाठी नदीच्या पाण्यात उतरल्या होत्या. पंरतु, पाण्याचा अंदाज न आल्याने उजा बुडायला लागली. यावेळी तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणी पाण्यात उतरल्या असता, त्याही बुडायला लागल्या. मात्र, त्यांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र उजा गवई ही सापडत नव्हती. तब्बल १९ तासांनंतर उजाचा मृतदेह हाती लागला आहे.
उजाने 10 वीची परीक्षा दिली असून ती बुलढाण्यातील कासा येथे आपल्या नातेवाईकांकडे आली होती.
Last Updated : Jun 8, 2019, 4:34 PM IST