महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Body of 15 year old girl found in bag नायगावमध्ये बॅगेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे कोडे उलगडले - Body of 15 year old girl found in bag

एका 15 वर्षीय तरुणीचा मृतदेह बॅगेत सापडला Body of 15 year old girl found in bag. या प्रकरणी ३०२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अल्पवयीन मुलीच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला करुन हा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे वालीव पोलिसांनी सांगितले. तिची ओळख पटली आहे.

death
death

By

Published : Aug 27, 2022, 9:00 AM IST

Updated : Aug 27, 2022, 2:57 PM IST

पालघरनायगाव पश्चिमेकडील उड्डाणपूलाच्या परिसरात असलेल्या झुडपात मृतदेह एका बॅगेत भरून टाकण्यात आला होता. वालीव पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. नायगाव पश्चिमेकडील उड्डाणपूलाच्या खाली शुक्रवारी दुपारी एक प्रवासी बॅग आढळून आली. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बॅगेची तपासणी केली. या बॅगेत चादरीमध्ये एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह गुंडाळून टाकण्यात आला होता. तिच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली होती.

वालीव पोलिसांनी या मुलीची ओळख पटवली असून ती अंधेरी येथे राहणारी आहे. गुरूवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार आल्यानंतर अंधोरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला होता.

मारेकरी ट्रेनमध्ये घेऊन आला मृतदेह प्रवासी बॅगेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपी लोकल ट्रेनमधून उतरून या ठिकाणी आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आम्ही आरोपीची ओळख पटवली असून लवकरच त्याला अटक करू अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.

हेही वाचा Judge Salve on Bilkis Bano Case बिल्किस बानो केसमधील ११ आरोपींच्या निर्दोष मुक्तततेवर, शिक्षा ठोठावणारे माजी न्यायधीश साळवे यांचा आक्षेप

Last Updated : Aug 27, 2022, 2:57 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details