महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातपाटी रामनवमीची 140 वर्षांची परंपरा दुसऱ्यांदा खंडित

पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील 140 वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. सातपाटी येथे मोठ्या जल्लोषात रामनवमी निमित्त यात्रा भरते. मात्र, कोरोना संकटामुळे गेल्या 2 वर्षांपासून यात्रा झाली नाही. यंदाही साध्या पद्धतीने कमी लोकात रामनवमी साजरी करण्यात आली.

Palghar
Palghar

By

Published : Apr 22, 2021, 3:02 PM IST

पालघर :साने गुरुजी, संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातपाटी येथील राम मंदिरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील राम जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली. ३ दिवस चालणारा हा उत्सव रद्द करण्यात आला. रामनवमीनिमित्त राम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून राम जन्मोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

सातपाटी येथील रामनवमी उत्सवाला शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा:-

पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे मासेमारीसाठी जगभर प्रसिद्ध गाव आहे. येथील रामनवमी उत्सवाला 140 वर्षाची परंपरा आहे. या गावात दिवाळीपेक्षा श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. रामनवमी दरम्यान येथे ३ दिवस मोठी यात्रा भरते. कामानिमित्त गावाबाहेर राहण्यासाठी गेलेले नागरिक, माहेरवासिनी आपल्या कुटुंबासह यात्रेसाठी गावी येतात. या दरम्यान गावातील ३००-४०० बोटीद्वारे केली जाणारी मासेमारीही पूर्णतः बंद असते. तसेच जिल्ह्यातील हजारो भाविक यात्रेनिमित्त सातपाटी येथे गर्दी करतात.

सलग दुसऱ्या वर्षी यात्रा खंडित :

गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर ही यात्रा रद्द करण्यात आली. यावर्षी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामस्थांनी ही यात्रा रद्द केली. त्यामुळे रामनवमी उत्सवाची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी देखील खंडित झाली.

दरम्यान, सातपाटी येथील राम मंदिरात पोलिसांनी दिलेल्या सूचनेचेनुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून, अत्यंत साध्या पद्धतीने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details