महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्जवाटप - ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक न्यूज

कोरोनामुळे तयार झालेल्या आर्थिक अडचणींमुळे अनेक बँका शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज देण्यास नकार देत आहेत. मात्र, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके शेतकऱ्यांबाबत आपुलकी जपत कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. यासाठी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व संचालक मंडळाने 'बँक शेतकऱ्यांच्या बांधावर' असा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

Loan Distribution
कर्जवाटप

By

Published : Jun 25, 2020, 5:07 PM IST

पालघर(विरार) - कोरोना महामारीमुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे अनेक बँका शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज देण्यास नकार देत आहेत. मात्र, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके शेतकऱ्यांबाबत आपुलकी जपत कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. यासाठी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व संचालक मंडळाने 'बँक शेतकऱ्यांच्या बांधावर' असा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्जवाटप

आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटी नाही तर चारशे कोटी द्यावे लागले तरी द्या, अशा सूचना बँकांना दिल्या होत्या. त्याला प्रतिसाद देत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाटप सुरू केले आहे. बांधावर कर्ज देण्याच्या उपक्रमावेळी आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, दिगंबर हौसारे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत जाखडी, उपनिबंधक योगेश देसाई, शाखा प्रबंधक राजेश मस्तान, राहुल जाधव, भालचंद्र पाटील, प्रकाश राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उसगाव, मेढे येथील २५ शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आज कर्ज देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details