पालघर - येथीलमुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोपरी येथे दुभाजकावर टेम्पो चढल्याची घटना घडली. रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. यात टेम्पोचे नुकसान झाले असून स्थानिकांच्या मदतीने टेम्पो उचलून पुन्हा रस्त्यावर काढण्यात आला.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टेम्पोचा अपघात; वाहतुकीचा खोळंबा - पालघर बातमी
अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली. या मार्गावरील दुभाजक गेल्या वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्याला रंगही देण्यात आलेला नाही. तसेच या मार्गावर दिव्याची सोय नाही.

tempo-accident-on-mumbai-ahmedabad-highway-in-palghar
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टेम्पोचा अपघात
हेही वाचा-'आईनेच दिला मराठीचा पहिला धडा'; फ्रान्सिस दिब्रिटो यांची विशेष मुलाखत
या अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरील दुभाजक गेल्या वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्याला रंगही देण्यात आलेला नाही. तसेच या मार्गावर दिव्याची सोय नाही. त्यामुळे याठिकाणी अनेकवेळा अपघातचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे या तुटलेल्या दुभाजकावर महापालिकेने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होते.