महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar crime news: वडिलांनी लैंगिक शोषण केल्याची तक्रार करत किशोरवयीन मुलीची आत्महत्या - चाकूने अनेक जखमा असलेल्या महिलेचा मृतदेह

पालघरमध्ये किशोरवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या सुसाइड नोट'मध्ये वडिलांकडून लैंगिक शोषण झाल्याचा उल्लेख आहे. तर दुसऱ्या घटनेत पोलीसांना कळवा शहरात चाकूने अनेक जखमा असलेल्या महिलेचा मृतदेह सापडला आहे.

Palghar crime news
किशोरवयीन मुलीने केली आत्महत्या

By

Published : Mar 3, 2023, 12:45 PM IST

पालघर :महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात एका 14 वर्षीय मुलीने तिच्या घरीच आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी सुसाइड नोट जप्त केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. मुलीने तीन दिवसांपूर्वी वलीव येथील तिच्या कुटुंबीयांच्या घरी जीवन संपवले. गुरुवारी ही सुसाईड नोट सापडली.

कठोर शिक्षा देण्याची मागणी : तिच्या मृत्यूनंतर, अल्पवयीन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत्युची अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली, मुलीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये, तिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. त्या नोटमध्ये असे म्हटले आहे की, तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला असला तरी, नंतर त्यावर कोणतेही पाऊल उचलण्यात अयशस्वी झाले, एका अधिकाऱ्याने सांगितले. या नोटमध्ये, मुलीने वडिलांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अधिकारी म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

चाकूच्या जखमा असलेला मृतदेह :ठाणे शहरातील कळवा येथे एका 33 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या घरात सापडला आहे. गुरुवारी संध्याकाळी जय भीम नगर परिसरात मृतदेह आढळून आला. कमलीबाई पवार असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एक महिला तिच्या घरात जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती.

हत्येमागील हेतूची तपासणी : पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली. ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. कोणीतरी तिच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. महिलेला जवळच्या नागरी रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे पोलिस अधिकारी म्हणाले. हत्येमागील हेतू तपासला जात असून आरोपींची ओळख पटवली जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : Sexual Assaulting Minor Girl: पनवेल रेल्वे स्थानक परिसरात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details