महाराष्ट्र

maharashtra

तारापूर एमआयडीसी स्फोटातील मृतांचा आकडा ७ वर

By

Published : Jan 11, 2020, 7:31 PM IST

Updated : Jan 12, 2020, 9:45 AM IST

तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण स्फोटाच्या आवाजाने 15 किलोमीटर आसपासचा परिसर हादरला. औद्योगिक वसाहतीतील तारा नायट्रेट या कंपनीतील रिअ‌ॅक्टरची टेस्ट घेत असताना भीषण स्फोट झाला आहे. यात ७ कामगारांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी आहेत.

blast  at near tarapur midc
पालघरमधील तारापूर औद्योगिक परिसरात मोठा स्फोट

पालघर - तारापूर औद्योगिक वसाहतीतील तारा नायट्रेट (ए. एन. के फार्मा) कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात ७ जणांचा मृत्यू, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री पावणे तीनच्या दरम्यान पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

या दुर्घटनेत अजूनही दोघे बेपत्ता असून, यात एका लहान मुलीचाही समावेश असण्याची शक्यता असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. सध्या याठिकाणी एनडीआरएफकडून बचावकार्य आणि शोधमोहीम सुरू असून, बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सध्या घेतला जात आहे. यासंदर्भात सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख तर जखमी असलेल्या कामगारांना मोफत वैद्यकीय सेवा देणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी रात्री पावणे तीनच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली..
घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू..

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 या प्लॉटमधील कारखान्यात संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकली नाही. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून जखमी व मृत कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कंपनीच्या आवारामध्ये किमान 8 कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट
तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट

बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तुंगा रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींचीही भेट घेतली आहे. यावेळी बोलताना त्यांनी झालेल्या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले. तसेच या औद्योगिक भागामध्ये, सर्व सुविधांयुक्त असे रुग्णालय असण्याची गरज व्यक्त केली. तसेच, अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही ते म्हटले. तसेच एनडीआरएफला पाचारण केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली..

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना सर्व वैद्यकीय सहाय्य पुरविण्याचे निर्देशही दिले असून मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असल्याची माहिती मिळत आहे. अशाप्रकारचे ट्वीट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने केले आहे.

Last Updated : Jan 12, 2020, 9:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details