पालघर -तारापूर औद्योगिक वसाहतीतील तारा नायट्रेट या कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. यात कंपनीच्या आवारातील 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कंपनीत झालेल्या या भीषण स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये मदत घोषित केली असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
तारापूर एमआयडीसी स्फोट: राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण स्फोटाच्या आवाजाने 5 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. या दुर्घटनेत 8 कामगार ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण स्फोटाच्या आवाजाने 5 किलोमीटर आसपासचा परिसर हादरला आहे. यात 8 कामगार ठार झाले असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तारा नायट्रेट या कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पथकाला चार ते पाच कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून, काही कामगार अजूनही कंपनीमध्येच अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. स्फोटामुळे बाजूची कन्स्ट्रक्शन चालू असलेली इमारत कोसळली आहे. इमारती खालीसुद्धा काही कामगार अडकले असल्याची शक्यता आहे.