विरार(पालघर)विरारमध्ये टॅंकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टॅंकर- दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू - विरारमध्ये अपघात
विरारमध्ये टॅंकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विरार पूर्वमधील चंदनसार रोडवर हा अपघात झाला. केतन पाटील (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. केतन हा मंगळवारी दुपारी आपल्या मित्रासह दुचाकीवरून घरी जात होता. मात्र त्याचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला आदळली, गाडी स्वीप होऊन ते दोघेही खाली पडले, दरम्यान त्याचवेळी मागून येणाऱ्या टॅंकरच्या चाकाखाली सापडल्याने केतन याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा मित्र जखमी झाल असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानी टॅंकरच्या चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -पुणे; मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडली बॉम्ब सदृश वस्तू; परिसरात खळबळ