विरार(पालघर) - भरधाव वेगाने जाणार्या पाण्याच्या टॅंकरने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी विरार पूर्वेच्या भाटपाडा येथे ही घटना घडली. मृतांमध्ये दहा वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. अपघातानंतर टॅंकर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
- एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू -
विरारच्या चांदीप गावात राहणारे शामराव मढी (३२) हे मंगळवार सकाळी आई सुनिता मढवी (६०) आणि मुलगी वेदा (१०) यांच्यासह बाजारात निघाले होते. हे तिघे एकाच दुचाकीवरून जात होते. ते विरारच्या भाटपाडा येथून जात असताना मागून येणार्या एका भरधाव टॅंकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक योगेश शामराव मढवी व त्यांच्या पाठीमागे बसलेली आई सुनिता शामराव मढवी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर त्यांच्यासोबत प्रवास करणारी योगेशची ७ वर्षीय मुलगी वेदा मढवी ही गंभीर जखमी झाली. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा टॅंकर भरधाव वेगाने विरार दिशेने जात होता. टॅकरने पुढे असलेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
- वसई विरारमधील बेकायदेशीर टॅंकरचा प्रश्न ऐरणीवर-