पालघर -जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला असून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा 20 नोव्हेंबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय जनता पक्षातर्फे धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. भाजपच्यावतीने आज पालघरमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. विकासकामांना अडथळा आणण्याचे काम ते करत आहे. त्यांच्या अनेकदा चौकशा झाल्या असून ते दोषी असल्याचा अहवाल शासनाकडे गेला आहे. सुगावे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एकनाथ मेरे यांनी आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचे देखील आढळून आले आहे. या सर्व बाबतीत पुरावे दिलेले असूनसुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जात नाही, असा आरोप भाजपने केला आहे. जिल्ह्यात भ्रष्टाचारचे पेव आले असून अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.
कुपोषणात वाढ मात्र राज्य सरकारचे दुर्लक्ष -