पालघर - दमण येथील समुद्रात तटरक्षक दलाला एक संशयित स्पीड बोट आढळून आली होती. रात्री 2 ते 3 च्या दरम्यान दमण समुद्रात ही स्पीड बोट वावरत असल्याची माहिती पालघर पोलिसांकडून देण्यात आली. यानंतर सागरी पोलीस, तटरक्षक दल तसेच मच्छीमार यांना सतर्क राहण्याच्या सूचना पालघर पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलीस व तटरक्षक दल यांच्यातर्फे शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दमणच्या समुद्रात संशयित स्पीड बोटीचा वावर; तटरक्षक दलाकडून सर्च ऑपरेश सुरू - palghar coastguards
दमण येथील समुद्रात तटरक्षक दलाला एक संशयित स्पीड बोट आढळून आली आहे. यानंतर सागरी पोलीस, तटरक्षक दल तसेच मच्छीमार यांना सतर्क राहण्याच्या सूचना पालघर पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
दमण येथील समुद्रात तटरक्षक दलाला एक संशयित स्पीड बोट सापडली आहे.
रात्रीची वेळ असल्याने या बोटीचे अस्पष्ट वर्णन पोलिसांच्या हाती आले आहे. तसेच बोट कोणत्या दिशेने गेली, याबाबत माहिती प्राप्त झाली नाही.
पालघर सागरी हद्दीतील तटरक्षक दल, ग्रामरक्षक दल सदस्य, मच्छिमार सोसायटी पदाधिकारी तसेच बोट मालक, चालक व स्थानिक ग्रामस्थ यांना समुद्रात काही संशयास्पद आढळल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.