पालघर- विदेशातून परतलेले चार प्रवासी गरीबरथ एक्सप्रेसमधून सुरतसाठी वांद्रे टर्मिनसहून प्रवास करत होते. त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का असल्याने इतर प्रवाशांनी ही बाब तिकीट तपासणीसाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्या चौघांची वैद्यकीय तपासणी करून सुरत येथील त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे.
पालघर : चार कोरोना संशयितांना रेल्वेतून उतरवले, थेट घराकडे केली रवानगी - होम क्वॉरंटाईन
होम क्वॉरंटाईन असलेल्या चौघांना रेल्वेतून उतरवून खासगी वाहनातून त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे.
मुंबईतील वांद्रे टर्मिनसहून गरीबरथ एक्सप्रेस रेल्वे मार्गस्थ झाली. यामध्ये कोरोना संशयित असलेले विदेशातून आलेले चार प्रवासी होते. त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का होता. सहप्रवाशांना ते चार प्रवासी कोरोनाग्रस्त असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी ही बाब टीसीच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर टीसीने ही रेल्वे पालघर रेल्वे स्थानकात थांबविली. त्यानंतर त्या चार प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. पण, त्यांना सार्वजनिक वाहनातून प्रवास करु शकत नसल्याने, पोलिसांनी त्यांना बंदोबस्तात खासगी वाहनातून त्यांच्या घरी पाठवले आहे.
हेही वाचा -'तक्रारी, हरकती थेट ई-मेलने पाठवा'..जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन