पालघर -पालघर जिल्ह्यातील Boy commits suicide in Palghar district सफाळे पश्चिमेकडील कांद्रेभुरे गावात एका तरुणाने आत्महत्या केल्याची young man committed suicide in Kandrebhure village घटना घडली आहे. मुलाने झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पाहून आईने देखील चक्क विहिरीत उडी मारून आत्महत्या mother committed suicide केल्याची दुर्दैवी घटना कांद्रेभुरे गावात घडली आहे. कांद्रेभुरे गावातील शैलेश दिनेश पाटील Shailesh Dinesh Patil (वय, २५ वर्षे) या तरुणाने गावातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या आईने घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलाला गळफास घेतलेले पाहून भयंकर मानसिक धक्का बसल्याने तिनेही गावातील विहिरीत उडी मारली. दरम्यान, गावातील काही लोकांनीही विहिरीत उड्या मारून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्रस तोवर पाण्यात गुदमरून त्या मातेचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेले असून गावावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
Youth Suicide Kandrebhure : तरुण मुलाची आत्महत्या; धक्क्याने आईनेही संपवले जीवन - कांद्रेभुरे गावाची आत्महत्या
पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे येथील रहिवासी शैलेश दिनेश पाटील (वय २६) या तरुणाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या young man committed suicide in Kandrebhure village केली. तर मुलाच्या मृत्यूचे दु:ख अनावर झाल्याने आई कल्पना पाटील यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या mother committed suicide केल्याची धक्कादायक घटना घडली.

घटनेचे कारण अद्याप गुलदस्तात - शैलेशने अचानक असे पावूल उचलून स्वतःचे आयुष्य का संपविले, यासंदर्भातील कारण मात्र अद्यापपर्यंत समजू शकले नाही. याप्रकरणी केळवा सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. मात्र, शैलेशच्या काही निकटवर्तीयांकडून अशी माहिती मिळाली की, महिनाभरापूर्वी त्याचे सोशल अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्याने यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती. मात्र त्यानंतर तो सतत मानसिक तणावात वावरत होता. तसेच तो नेहमीच आत्महत्या करण्याच्या विरोधात असायचा आणि याबाबत तो नेहमी मित्रांशी गप्पा मारायचा. परंतु आज त्यानेच असे पावूल उचलल्याने त्याच्या मित्र परिवारात भयंकर दुःखाचे वातावरण आहे.