पालघर- मासवण येथील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेचा अजब कारभार समोर आला आहे. या आश्रमशाळेत 'व्हर्च्युअल क्लासरूम प्रोजेक्ट' या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे येणार होते. या प्रसंगी येणाऱ्या मंत्री महोदय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी विद्यार्थ्यांना भर उन्हात शाळेने तासंतास उभे ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
मंत्र्यांची वाहने सावलीत अन् विद्यार्थी उन्हात ताटकळत; मासवण आश्रमशाळेतील प्रकार - maswan ashram school
मासवन येथील अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेत शिक्षण मंत्री विनोद तावडे हे येणार होते. यासाठी मंत्र्यांच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी विद्यार्थ्यांना भर उन्हात शाळेने तासंतास उभे करण्यात आले होते.
मासवन येथील अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेत 'व्हर्च्युअल क्लासरूम' तयार करण्यात आली असून डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. गुरुवारी या व्हर्च्युअल क्लासरूमच्या उद्घाटनासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण येणार होते. मात्र, दोन्ही मंत्री महोदयांचा दौरा रद्द झाल्याने हे प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी पार्किंगमध्ये तासंतास ताटकळत उभे होते. मंत्र्यांचे दौरे रद्द झाल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी ऐनवेळी येऊन या व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन केले.