महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Student Deathbody Found : उमरोळीजवळील विहिरीत आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह; आत्महत्या की हत्या? - भोईसर विद्यार्थी मृतदेह आढळला

बोईसर रस्त्यावरील उमरोळीनजीक एका विहिरीत विद्यार्थ्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून (student deathbody found) आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चेतन खंदारे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

student deathbody
मृतदेह सापडलेला विद्यार्थी

By

Published : Mar 24, 2022, 6:16 PM IST

पालघर - बोईसर रस्त्यावरील उमरोळीनजीक एका विहिरीत विद्यार्थ्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून (student deathbody found) आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चेतन खंदारे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

तीन आठवड्यांपासून विद्यार्थी होता बेपत्ता :चेतन खंदारे हा विद्यार्थी पालघरमधील सेंट जॉन महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिरंगमध्ये शेवटच्या वर्षातील शिक्षण घेत होता. चेतन 3 मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. त्यानंतर आज त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत उमरोळीनजीक एका विहिरीत आढळला आहे.

विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह : पालघर- बोईसर रस्त्यावरील उमरोळी येथील मोहरे ब्रिजजवळ असलेल्या एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत कुटुंबीयांची ओळख पटल्यानंतर मृतदेह हा बोईसर येथील बेपत्ता झालेल्या चेतन खंदारे याचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. चेतन खंदारे याने आत्महत्या केली की हत्या करण्यात आली याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details