पालघर - महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे धडक कारवाई केली. यावेळी अवैधरित्या महाराष्ट्र येणारी दादरा नगर हवेली बनावटीची दारू जप्त केली.
जव्हारमध्ये ३२ लाखांचा दारू साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - News about the State Excise Department
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे धडक कारवाई केली. यावेळी अवैद्य दारू जप्त केली. यावेळी १७ लाख ४५ हजार ५२० रुपये किंमतीचे दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले.
![जव्हारमध्ये ३२ लाखांचा दारू साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई state-excise-department-seized-illegal-liquor-in-palghar-district](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5362817-81-5362817-1576238785210.jpg)
दादरा नगर हवेली, दमण बनावटीची अवैध दारू मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी एका भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्येतब्बल 17 लाख 45 हजार 520 रुपये किंमतीच्या दारूचे एकूण 45 बॉक्स आढळून आले. विशेष म्हणजे टेम्पोमध्ये दारू वाहतूक करण्यासाठी गुप्त, असा कप्पा तयार करण्यात आला होता.
भरारी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 17 लाखांपेक्षा अधिक दारू, 15 लाखांचा टेम्पो, असा एकूण 32 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दादर नगर हवेली आणि दमण येथून अवैधरित्या दारू महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येणाऱ्या वाहनांवर करडी नजर राहणार आहे.