महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.73 टक्के; मुलींचा उत्तीर्ण दर मुलांहून अधिक - पालघर एसएससी बातमी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज (दि. 29 जुलै) ऑनलाईन जाहीर झाला आहे. पालघर जिल्ह्याचा निकाल 96.73 टक्के लागला आहे.

file photo
file photo

By

Published : Jul 29, 2020, 5:11 PM IST

पालघर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज (दि. 29 जुलै) ऑनलाईन जाहीर झाला आहे. पालघर जिल्ह्याचा निकाल 96.73 टक्के लागला असून परीक्षेस बसलेल्या 54 हजार 966 विद्यार्थ्यांपैकी 53 हजार 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी देखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून 97.38 टक्के विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातील 55 हजार 336 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यापैकी 54 हजार 966 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले. त्यातील 53 हजार 168 म्हणजेच 96.73 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेस बसलेल्या 29 हजार 223 मुलांपैकी 28 हजार 99 मुले उत्तीर्ण म्हणजेच 96.14 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तसेच 25 हजार 743 मुलींपैकी 25 हजार 69 उत्तीर्ण म्हणजेच 97.38 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून इयत्ता दहावीच्या निकालात यंदा देखील पालघर जिल्ह्यातील मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या आहेत.

पालघर जिल्ह्यात पालघर तालुक्यात सर्वाधिक 97.61 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल वसई तालुक्यातील 97.56 टक्के, विक्रमगड तालुक्यातील 96.16 टक्के, डहाणू तालुक्यातील 96.08 टक्के, जव्हार तालुक्यातील 95.92, वाडा तालुक्यातील 95.38 टक्के, तलासरी तालुक्यातील 94.22 टक्के, मोखाडा तालुक्यातील 87. 28 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील 8 हजार 963 विद्यार्थी इयत्ता दहावीच्या पुनर्परीक्षेस बसले होते. यांपैकी 80.61 टक्के म्हणजेच 7 हजार 225 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details