पालघर- डहाणू तालुक्यातील सावटा -आगवन रोडवरील एका 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या स्पेक्टीकल कोबरा सापाला सर्पमित्राने सुखरूप बाहेर काढले.
30 फूट खोल विहिरीत पडला स्पेक्टीकल कोब्रा, सर्प मित्राने दिले जीवदान
सावटा-आगवन रोडवर एका खासगी चिकू वाडीतील 30 फूट खोल विहिरीत स्पेक्टीकल कोबरा साप पडला होता. त्याला सर्पमित्राने सुखरूप बाहेर काढले.
सावटा-आगवन रोडवर एका खासगी चिकू वाडीतील 30 फूट खोल विहिरीत एक साप पडला असल्याची माहिती वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्थेला माहिती मिळाली. त्यानंतर सर्पमित्र रेमंड डिसोझा हे वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सर्पमित्र दोरखंडाच्या साहायाने विहिरीत उतरले व सापाला पकडून कंतानात घालून सहकाऱ्यांच्या मदतीने सुखरूप विहिरी बाहेर काढले. त्यानंतर या सापाला जंगलात सोडण्यात आले.
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे तहानलेले वन्य जीव थंड स्थळ, पाण्याच्या आणि भक्षाच्या शोधात भटकताना विहिरीत पडून किंवा इतर कारणामुळे अपघातग्रस्त होतात. त्यांना वेळीच मदत न मिळाल्यास जीवास मुकावे लागते.