महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील 1200 कामगारांना घेऊन विशेष श्रमिक रेल्वे झबुआसाठी रवाना - corona virus in palghar

पालघर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील कामगार व मजुरांना घरी पाठविण्यासाठी रविवारी पालघर ते झबुआ या विशेष रेल्वे गाडीची सुविधा उपलब्ध करण्यात आली. जिल्ह्यात अडकलेल्या या सर्व मजुरांना ई-पास देऊन बसने पालघर रेल्वे स्थानकात आणण्यात आले.

shramik train
अडकलेल्या मध्यप्रदेशातील 1200 कामगारांना घेऊन विशेष श्रमिक रेल्वे झबुआसाठी रवाना

By

Published : May 11, 2020, 9:40 AM IST

पालघर - लॉकडाऊनमुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील 1200 कामगारांना पालघर रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक रेल्वेने झबुआसाठी रवाना करण्यात आले. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत ही विशेष रेल्वे रविवारी रात्री 9 वाजता झबुआसाठी रवाना झाली. उपस्थितांनी गावी परत जाणाऱ्या कामगार व मजुरांना शुभेच्छा दिल्या आणि टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना करण्यात आले.

पालघर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील 1200 कामगारांना घेऊन विशेष श्रमिक रेल्वे झबुआसाठी रवाना

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे रखरखत्या उन्हात अनेक कामगारांनी पायपीट करत आपल्या मूळगावी जाण्याचा रस्ता धरला होता. तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाऊन दरम्यान परराज्यातील नागरिकांना घरी पाठविण्याला हिरवा कंदील मिळाला आहे.

अडकलेल्या मध्यप्रदेशातील 1200 कामगारांना घेऊन विशेष श्रमिक रेल्वे झबुआसाठी रवाना

पालघर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील कामगार व मजुरांना घरी पाठविण्यासाठी रविवारी पालघर ते झबुआ या विशेष रेल्वे गाडीची सुविधा उपलब्ध करण्यात आली. जिल्ह्यात अडकलेल्या या सर्व मजुरांना ई-पास देऊन बसने पालघर रेल्वे स्थानकात आणण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून गाडीमध्ये बसवण्यात आले. या प्रवाशांना हा प्रवास विनामूल्य असून जेवण व पिण्याचे पाणी देऊन टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. आपल्या मूळ गावी रवाना होताना या प्रवाशांनी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.

अडकलेल्या मध्यप्रदेशातील 1200 कामगारांना घेऊन विशेष श्रमिक रेल्वे झबुआसाठी रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details