महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Soldier of Vikramgad die in Pathankot - विक्रमगडच्या जवानास पठाणकोटमध्ये वीरमरण, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - पंजाब

पालघर : विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे गावचे सुपूत्र महेश रामा पडवळे ( Rama Padwale ) या जवानास ( Soldier ) वीरमरण आले आहे. पंजाब ( Punjab ) येथील पाकिस्तान सीमेवर ( Pakistan border ) ते कर्तव्य बजावत होते. महेश पडवले यांचं पार्थिव रात्री मुंबईत आल्यानंतर आज (6 जून) रोजी त्यांच्यावर पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे या त्यांच्या मूळगावी या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

रामा पडवळे
रामा पडवळे

By

Published : Jun 6, 2022, 10:44 AM IST

पालघर :विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे गावचे सुपूत्र महेश रामा पडवळे या जवानास ( Soldier ) वीरमरण आले आहे. पंजाब ( Punjab ) येथील पाकिस्तान सीमेवर ( Pakistan border ) ते कर्तव्य बजावत होते. महेश पडवले यांचं पार्थिव रात्री मुंबईत आल्यानंतर आज (6 जून) रोजी त्यांच्यावर पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे या त्यांच्या मूळगावी या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे या त्यांच्या मूळगावी या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सर्पदंशाने झाला मृत्यू -पठाणकोटमधील माधोपूर जवळ थारियाल गावात महेश पडवळे हे 2019 पासून भाड्याच्या घरात राहत होते. पाच जून रोजी कर्तव्य बजावत असताना जवान महेश पडवळे यांच्या डाव्या हाताला सर्पदंश झाला होता. या घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका आणि नर्सिंग असिस्टंटना त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. महेश पडवळे यांना पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details