महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चक्रीवादळाच्या तडाख्यात मानवी वस्तीत धाव घेणाऱ्या पक्षी, सापांना सर्पमित्रने दिले जीवदान - taukate cyclon palghar news

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाखा बसल्याने अनेक पक्षी, साप मानवी वस्तीत येत असल्याचे दिसून आले आहे. अशा तब्बल ५० हून अधिक वेगवेगळ्या जातीचे विषारी व बिनविषारी साप आणि पक्ष्यांना सर्पमित्र सुरज पांडे यांनी रेस्क्यू केले आहे.

snake-and-bird-rescued-from-human-habitat
चक्रीवादळाच्या तडाख्यात मानवी वस्तीत धाव घेणाऱ्या पक्षी, सापांना सर्पमित्रने दिले जीवदान

By

Published : May 22, 2021, 5:25 PM IST

पालघर(वसई/विरार) - गेल्या चार दिवसात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात माणसांसह मुक्या जनावारांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. अनेक सापांच्या बिळात पावसाचे पाणी शिरले तर वादळी वाऱ्याने अनेक पक्षांची घरटी तुटल्याने त्यांनी आसऱ्यासाठी मानवी वस्तीत धाव घेतल्याचे दिसून आले आहे. अशा विविध साप आणि पक्ष्यांना सर्पमित्र सूरज पांडे यांनी सुरक्षितपणे वाचवले आहे.

चक्रीवादळाच्या तडाख्यात मानवी वस्तीत धाव घेणाऱ्या पक्षी, सापांना सर्पमित्रने दिले जीवदान

५०हून अधिक साप, पक्ष्यांना जीवदान

सर्पमित्र सूरज पांडे यांनी वेगवेगळ्या परिसरातील मानवी वस्तीतून तब्बल ५०हून अधिक वेगवेगळ्या जातीचे विषारी व बिनविषारी साप व पक्षी त्याने रेस्क्यू केले आहेत. यामध्ये नाग, घोणस, हरीणटोळ अशा विविध जातींचे साप असून एक घुबड आणि काही पक्ष्यांचाही समावेश आहे. पावसामुळे परिसरात सर्वच ठिकाणी पाणी साचले असल्याने अनेक साप बिळातून बाहेर पडत मानवी वस्तीत आडोसा घेत आहेत. त्यामुळे असे साप आढळल्यास त्यांना न मारता याची माहिती प्राणीमित्रांना द्यावी आणि त्यांचा जीव वाचवावा असे आवाहन प्राणीप्रेमींमधून केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details