महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नालासोपारामधील धानीवबाग परिसरात सहा घरे कोसळली - पालघर नालासोपारा

वसई-विरारमध्ये गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका नालासोपारा पूर्वेकडील धानीवबाग परिसराला बसला. या परिसरात साचलेले कंबरभर पाणी व पावसाच्या माऱ्यामुळे येथील सहा ते आठ चाळीतील बैठी घरे कोसळली आहेत.

धानीवबाग
धानीवबाग

By

Published : Jul 21, 2021, 7:06 PM IST

Updated : Jul 21, 2021, 7:20 PM IST

पालघर -वसई विरारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेच्या धानीवबाग परिसरातील घरांचे नुकसान झाले आहे. येथिल चाळीत असलेल्या सहा ते सात घरे पावसाच्या पाण्यात कोसळल्याने नागरिकांवर ऐन पावसात बेघर होण्याची वेळ आली आहे. परिसरातील नागरिकांची घरे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.

धानीवबाग परिसरात सहा घरे कोसळली

घरांची मोठी पडझड

वसई-विरारमध्ये गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका नालासोपारा पूर्वेकडील धानीवबाग परिसराला बसला. या परिसरात साचलेले कंबरभर पाणी व पावसाच्या माऱ्यामुळे येथील सहा ते आठ चाळीतील बैठी घरे कोसळली आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पावसाच्या पुरात संपूर्ण घरच वाहून गेल्याने रहिवाशांचे संपूर्ण संसार उध्वस्त झाले आहेत. आपल्या हक्काचे घरचं वाहून गेल्याने नुकसानग्रस्तांपुढे मोठे संकट उभे झाले आहे. मात्र प्रशासन अद्यापही पोहोचले नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. वसई विरारमध्ये गेल्या दहा वर्षात बेकायदा बांधकामांनी उच्छाद मांडला आहे. ज्यात अनेक नैसर्गिक नाले, पाणथळ जागा बुजविण्यात आले आहेत. या अनधिकृत बांधकामांना आर्थिक उलाढाल करून संरक्षण देण्याचा मोठा वाटा मनाला जातो. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अशा बेकायदेशीर बांधमकामांतून घडणाऱ्या अपघातांना महापालिकाच जवाबदार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

Last Updated : Jul 21, 2021, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details