महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! क्वॉरंटाईनच्या भीतीने वडिलांचा मृतदेह चार दिवसांपासून घरातच ठेवला, मुलीने केली आत्महत्या - कोरोनाची भीती

हरिदास सहरकर यांचा १ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. मात्र त्यांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असेल असा समज त्या घरातील मुलींनी केला. त्यामुळे आता घरातील इतर सदस्यांना क्वारंटाईन करण्यात येईल या भीतीपोटी त्यांनी हरिदास यांचा मृतदेह अंत्यसंस्कार न करता घरातच ठेवला. एवढेच नाहीतर त्यांनी त्यांच्या मृतदेहासमोर कापूर आणि अगरबत्ती लावून ठेवल्याचे उघडकीस आले.

क्वॉरंटाईनच्या भीतीने वडिलांचा मृतदेह चार दिवसांपासून घरातच
क्वॉरंटाईनच्या भीतीने वडिलांचा मृतदेह चार दिवसांपासून घरातच

By

Published : Aug 5, 2021, 9:56 AM IST

पालघर/विरार -कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्यामुळे कोरोनाचे निर्बंध अद्याप पूर्णपणे हटविण्यात आले नाहीत. अशा परिस्थतीत विरारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाला या भीतीपोटी घरातील सगळ्यांनाच क्वारंटाईन करतील म्हणून त्या मृत व्यक्तीच्या 2 अविवाहित मुलींनी तब्बल 4 दिवस वडलांचा मृतदेह घरातच ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच या घटनेने आलेल्या नैराश्यातून यातील एका मुलीने समुद्रात आत्महत्या केल्याचीही खळबळजनक माहिती समोर आली आहे. विरार पश्चिम गोकुळ टाऊनशिप येथील ब्रोकलीन या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे.

हरिदास सहरकर यांची मुलगी

हरिदास सहरकर (७२) असे त्या कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. त्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर घर चालत होते. त्यांना विद्या (४०)आणि स्वप्नाली(३६) या अविवाहित मुली व पत्नी असा परिवार होता. मात्र हरिदास सहरकर यांचा १ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असेल असा समज त्या घरातील मुलींनी केला. त्यामुळे आता घरातील इतर सदस्यांना क्वारंटाईन करण्यात येईल या भीतीपोटी त्यांनी हरिदास यांचा मृतदेह अंत्यसंस्कार न करता घरातच ठेवला. एवढेच नाहीतर त्यांनी त्यांच्या मृतदेहासमोर कापूर आणि अगरबत्ती लावून ठेवल्याचे उघडकीस आले.

क्वॉरंटाईनच्या भीतीने वडिलांचा मृतदेह चार दिवसांपासून घरातच

एकीची आत्महत्या, दुसरीला वाचवण्यात यश-

मात्र वडिलांचा मृत्यू होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करता घरातच ठेवावा लागल्याने, हरिदास यांच्या एका मुलीने नैराश्यातून अर्नाळा समुद्रकिनारी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. मात्र त्या मृतदेहाची ओळख पटली नसल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, शुक्रवारी दुसऱ्या मुलीनेही आपले जीवन संपविण्याचा प्रयत्नात समुद्रात उडी मारली. मात्र सुदैवाने समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या घटनेची नोंद अर्नाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details