महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघरच्या मच्छिमाराचा मृत्यू

गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई यांच्या जलपरी बोटीत श्रीधर चामरे हा तरुण मागील तीन महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता. ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात बोटीवर मासेमारी करीत असताना पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर चामरे यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Shridhar Chamare a fisherman from Palghar was shot dead by Pakistani soldiers
पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर येथील मच्छिमाराचा मृत्यू

By

Published : Nov 7, 2021, 7:16 PM IST

Updated : Nov 7, 2021, 7:25 PM IST

पालघर - गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे (32) हा तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. बोटीचे कॅप्टन (तांडेल) हे देखील या गोळीबारात जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर येथील मच्छिमाराचा मृत्यू

मच्छिमाराला लागल्या तीन गोळ्या -

गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई यांच्या जलपरी बोटीत श्रीधर चामरे हा तरुण मागील तीन महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता. ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात बोटीवर मासेमारी करीत असताना पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर चामरे यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रीधर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती बोट मालक जयंतीभाई यांनी आपणास दिल्याचे वडराई मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन माणेंद्र आरेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बोटीचे कॅप्टन तांडेल यांना गोळी लागल्याने जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मच्छीमार बांधवांमध्ये तणावाचे वातावरण -

या घटनेमुळे जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तान सैनिकांच्या अमानवी कृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे.

हेही वाचा -धक्कादायक : मुलानेच सैनिक पित्याचा केला खून; घरगुती कारणांतून झाला होता वाद

Last Updated : Nov 7, 2021, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details