वसईच्या श्रद्धानंद वृद्धाश्रमातील आजीबाई आहेत कामात व्यग्र; नववर्षाच्या स्वागताची तयारी - पालघर वसई वृद्धाश्रम
सध्या सर्व आज्जीबाई वेगळ्याच कामात सद्या व्यग्र आहेत. फावल्या वेळात आपल्याला भेटीकरता येणाऱ्यांसाठी चक्क ग्रीटिंग कार्ड्स, मास्क तसेच कापडी पिशव्या बनविण्यात त्या सद्या मग्न आहेत. आश्रमातून निघणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून कमी खर्चात तयार केलेल्या या वस्तू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांना आजी देणार आहेत.
पालघर/वसई - वृद्धाश्रम हा शब्दच किती उदासवाणा वाटतो. पण खरंच वृद्धाश्रम इतके उदासवाणे असतात का? महिला दिन, एखाद्याचा वाढदिवस किंवा सणानिमित्ताने आपण वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना भेट देत असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांनी भरभरून दिलेले आशीर्वाद आपल्याला वेगळेच सुख देऊन जातो. मात्र, या वृद्धाश्रमातील आजी-आजोबा एरवी काय करतात, याचा कधी विचार केलाय का?. वसईतील श्रद्धानंद महिला आनंदाश्रमात राहणाऱ्या आजीबाईंना सद्या अशा गोष्टींवर विचार करायलाही वेळ नाही. कारण या सर्व आज्जीबाई वेगळ्याच कामात सद्या व्यग्र आहेत. फावल्या वेळात आपल्याला भेटीकरता येणाऱ्यांसाठी चक्क ग्रीटिंग कार्ड्स, मास्क तसेच कापडी पिशव्या बनविण्यात त्या सद्या मग्न आहेत. आश्रमातून निघणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून कमी खर्चात तयार केलेल्या या वस्तू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांना आजी देणार आहेत.