पालघर : वसईतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा ( Shraddha Murder Case ) तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक वसई येथे दाखल झाले आहे. कालपासून दिल्ली पोलिसांनी सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत. नव्याने श्रद्धाचा मित्र गॉडविन राॅड्रीग्ज, राहुल राय कॉल सेंटरचा मॅनेजर करण बहरी आणि श्रद्धाची मैत्रीण शिवानी म्हात्रे या चौघांचे जबाब नोंदवले असून काल दिल्ली पोलिसांनी डॉ. शिंदे आणि श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर या दोघांचे जबाब नोंदवले. मात्र, आजच्या जबाबातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताब हा श्रद्धाच्या गैरहजेरीत ड्रग्स विकत असे तसेच श्रद्धा आणि आफताब या दोघांना देखील ड्रग्सचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Shraddha Murder Case : श्रद्धा आणि आफताब दोघांनाही होते ड्रग्सचे व्यसन, पोलिसांनी दिली माहिती
वसईतील श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात (Shraddha Murder Case) अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धा आफताबच्या गैरहजेरीत ड्रग्स विकत असे तसेच श्रद्धा आणि आफताब या दोघांना देखील ड्रग्सचे व्यसन असल्याची माहिती, सुत्रांनी दिली.
गांजाचे सेवन करून केली हत्या - आफताबने गांजाचे सेवन करून श्रद्धाची हत्या केली आणि त्यानंतर तिचे 35 तुकडे केले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना त्याने दिली आहे. त्यामुळे आफताब याला ड्रग्सचे व्यसन असल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे. तसेच आज गॉडविनने दिलेल्या जबाब देखील श्रद्धा ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ माजली आहे. या तपासाचा महत्त्वाचा भाग असलेले आफताबचे आई-वडील अद्याप कुठे आहेत. याचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नसून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
अफताब ड्रग्स विकायचा? - आफताफचे आई-वडील गेली वीस वर्ष वसईत राहत होते. मात्र, अचानक दिवाळीच्या आधी त्यांनी घर खाली केले. त्यामुळे आफताबच्या आई-वडिलांना आफताबने केलेल्या क्रूर कृत्याची माहिती असावी, असा संशय पोलीस वर्तवत आहेत. त्यामुळेच आफताबचे आई वडील घर सोडून गेले असल्याची माहिती समोर येत आहे. आता पोलीस श्रद्धा ड्रग्स कोणाला विकत होती आणि कोणाकडून खरेदी करत होती याचा देखील तपास करण्याची शक्यता आहे. तसेच श्रद्धा आणि आफताबचे मित्र-मैत्रिणींची दिल्ली पोलीस अधिकाधिक तपास करून माहिती जाणून घेणार आहेत.