महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जयसागर धरण आटले; जव्हार शहराला वाघ नदीतून पाणीपुरवठा

जव्हार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरण कोरडा  झाला आहे. त्यामुळे जव्हार नगरपरिषद शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरच्या वाघ नदीतून पाणी घेत आहे. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पाठविल्यानंतर जव्हारकरांना पिण्या साठी दिले जात आहे.

जव्हार पाणीप्रश्नाबाबत माहिती देतांना जव्हार नगरपालिका नगराध्यक्ष व सहकारी

By

Published : Jun 27, 2019, 7:40 PM IST

पालघर (वाडा)- जव्हार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरण आटले आहे. त्यामुळे जव्हार नगरपरिषदने आता शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघ नदीतून शहरासाठी पाणीपुरवठा करत आहे. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पाठविल्यानंतर जव्हारकरांना पिण्या साठी दिले जात आहे.

जव्हार पाणीप्रश्नाबाबत माहिती देताना जव्हार नगरपालिका नगराध्यक्ष व सहकारी


जव्हार हे स्वातंत्र्यपुर्व काळात संस्थान होते. १४ सप्टेंबर १९६१ रोजी यशवंतरावराजे मुकणे यांनी जयसागर धरण बांधले. त्याकाळी लोकसंख्येच्या तुलनेत आजच्या जव्हार नगरपरिषदेची लोकसंख्या १५ हजाराच्या आसपास झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरजही अधिक वाढली आहे. अशातच दुष्काळामुळे पाणीपुरवठा करणाऱया जयसागर धरणाची जलपातळी खालावली. त्यातच पावसाने जून महिन्यात हजेरी न लावल्याने पाणी टंचाईत अधिकच भर पडली. या पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नगरपरिषदेद्वारे जव्हार तालुक्यातील वाघ नदीच्या पाण्याला डिझल पंपाच्या साहाय्याने उचलून, ते टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात सोडण्यात येत आहे. व त्यानंतर ते पाणी लोकांना पुरविल्या जात आहे. सद्या दिवस भरात १४ लाख लिटर पाणी जव्हारकरांना लागते आहे. मात्र, नगरपरिषदेद्वारे सद्या या नदीतून ८ ते ९ लाख लीटर पाणी उचलले जात असल्याची माहीती नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी दिली आहे.


यावेळी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा यंत्रणेच्या कामाची पाहणी करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, जव्हार नगरपालिका नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते दिपक कांगणे, नगरसेवक स्वप्निल औसरकर, प्रसन्न भोईर, परेश पटेल, साईनाथ नवले, अमित आहिरे, सोनवणे, अनिल नागपुरे, नगरपालिकेतील पाणीपुरवठा कर्मचारी व महिला कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details