महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : कुडूसमध्ये सराफी दुकानात दरोडा; ३ लाख ६० हजारांचे दागिने लंपास - Palghar Wada Robbery

वाडा तालुक्यातील कुडूस मध्ये मोठी बाजारपेठ आहे. या कुडूस येथील कृष्णा ज्वेलर्स दुकानात रात्री बारा वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून चांदी आणि सोने असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विकास सावळाराम चौधरी यांनी वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोविंद बोऱ्हाडे करीत आहेत.

कुडूसमधील याच दुकानात चोरट्यांनी दरोडा टाकला.

By

Published : Aug 30, 2019, 10:06 PM IST

Updated : Aug 30, 2019, 11:06 PM IST

पालघर -जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील कुडूस येथील कृष्णा ज्वेलर्स दुकानामध्ये मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरटय़ांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्य़ांनी सोने-चांदीच्या वस्तूंसोबत एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत वाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील कुडूस येथील कृष्णा ज्वेलर्स दुकानामध्ये मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरटय़ांनी दरोडा टाकल्याची घटना घडली.

वाडा तालुक्यातील कुडूस मध्ये मोठी बाजारपेठ आहे. या कुडूस येथील कृष्णा ज्वेलर्स दुकानात रात्री बारा वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर तोडले आणि एकूण चांदी आणि सोने असा ३ लाख ६० हजार रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. या प्रकरणी विकास सावळाराम चौधरी यांनी वाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर या चोरी प्रकरणात सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिव्हीडीआर चोरट्यांनी पळवून नेल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगितली जाते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोविंद बोऱ्हाडे करीत आहेत.

Last Updated : Aug 30, 2019, 11:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details