पालघर - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील 370 कलम हटविल्याच्या निर्णयाचे शिवसेनेने स्वागत केले आहे. सोमवारी राज्यसभेत ३७० हटवण्यासाठीचे विधेयक मंजूर करण्यात आले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत केले जात आहे.
काश्मीरमधील 370 कलम हटविल्याच्या निर्णयाचा शिवसेनेने केला जल्लोष - शिवसेनेने
काश्मीरमधील 370 कलम हटविल्याच्या निर्णयाचे शिवसेनेने स्वागत केले आहे. सोमवारी राज्यसभेत जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवण्यात आले.
काश्मीरमधील 370 कलम हटविल्याच्या निर्णयाचा शिवसेनेने केला जल्लोष
काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये होण्यासंदर्भात विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. नालासोपारा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ताशांच्या गजरात फटाके वाजवून आणि लाडू वाटून या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. लहान मुलांनी व महिलांनी सुद्धा नाचून आनंद व्यक्त केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, प्रवीण म्हाप्रळकर, प्रदीप सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिक महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.