पालघर/भाईंदर - आमदार नरेंद्र मेहता आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रचारासाठी सेव्हेन इलेवनच्या पटांगणावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेब ठाकरे कलादालनावरून झालेल्या राड्याबाबत दोन्ही पक्षाचे मनोमिलन झाल्याचे जाहीर केले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, राजन विचारे, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा, गणेश नाईक, संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपच्या बंडखोर गीता जैन यांनी मागितला सेनेकडे पाठिंबा, प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट - palghar news
'आमचं जमलंय' कला दालनावरून झालेला वाद मिटला असून भाजपच्या बंडखोर उमेदवार गीता जैन यांनी शिवसेनेकडे पाठींबा मागितल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
'आमचं जमलंय' कला दालनावरून झालेला वाद मिटला असून भाजपच्या बंडखोर उमेदवार गीता जैन यांनी शिवसेनेकडे पाठींबा मागितल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भाईंदरच्या जैन मंदिरात आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रचाराचे पोस्टर झळकले होते आणि जैन मुनींनी मेहता यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. पोस्टर प्रकरणी आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यांनी माझा प्रतिस्पर्धी कोणी नसून मीच पुढे आणि सर्व मागून येत असल्याचा दावा केला आहे.