पालघर - राज्य सरकारने आवाहन केल्यानुसार वाड्यात शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. येथे 5 रुपयात भोजन मिळणार आहे. आज वाडा प्रांताधिकारी अर्चना कदम, वाडा तहसीलदार उद्धव कदम, वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात वाडा नगरपंचायत जवळच स्वामी समर्थ महिला बचत गटाकडून ही योजना सुरू केल्याची माहिती वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली. वाडा नगरपंचायत क्षेत्राजवळच या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतून गरीब आणि गरजू लोकांना 5 रुपयात भात, चपाती डाळ असा मेनू असणार आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना याचा फायदा होणार आहे.
वाड्यात शिवभोजन योजना सुरू, 5 रुपयांत मिळणार भोजन - शिवभोजन योजना बातमी
राज्य सरकारने आवाहन केल्यानुसार वाड्यात शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. येथे 5 रुपयात भोजन मिळणार आहे.
वाड्यात शिवभोजन योजना सुरू
संचारबंदीच्या काळात या शिवभोजन योजनेचा कालावधी हा 12 ते 2 वाजेपर्यंत राहणार आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा देणारी किराणा, भाजीपाला याची दुकाने उघडण्याची वेळ 9 ते 12 असणार असल्याची माहिती उद्धव कदम यांनी दिली.