पालघर : पालघर तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीच्या मध्यभागी सागर तीरावर निसर्ग हिरवळीत असलेले केळवे गाव या ठिकाणी शीतला मातेचे स्वयंभू स्थान असून प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. नवरात्रीत मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात नऊ दिवस या ठिकाणी उत्सवाचे वातावरण अनुभवयास मिळते. ( Shitladevi mata of Kelva in palghar)
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव : केळवे हे बंदर होते. इसवी सन 1193 सालात महीकावती ही बिंबराजाची राजधानी असताना या बंदरावरून राजधानीचे संपूर्ण व्यापार उद्दीम चालायचा, मराठ्यांच्या राजवटीत तीन किल्ले बांधले असून त्यातील एक किल्ला केळवे बंदरात प्रवेश करतानाच लागतो. तो समुद्रात असून त्याला जंजिरा किल्ला असे म्हटले जाते. त्या काळात जकात नाका म्हणून त्या किल्ल्यास संबोधले जात असे, राजधानी माहिकावतीच्या संरक्षणाची जबाबदारी केळवा आणि माहीम इथल्या किल्ल्यावर होती इ.स. 1140 ते इसवी सन 1740 या कालावधीत हीच राजधानी होती. या संपूर्ण प्रदेशाचे राज्यकारभार इथूनच चालायचा, अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हे केळवे गाव शीतलादेवीच्या वास्तवाने पूनित झाले आहे. शितलादेवीचा नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्यापर्यंत साजरा करण्यात येतो.
अशी झाली देवीची सथापना : शितलादेवी देवस्थानाच्या समोरच्या बाजूस बगलवाडी नावाची बागायती वाडी आहे. शीतलादेवीची गुप्त स्वरूपात वास होता, कारण त्यांनी गावातील एका शेतकऱ्याचे स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला ही बातमी येथील गोपाळपंथीय लोकांना समजता त्या लोकांनी देवीचा शोध घेतला देवीच्या निश्चित ठाव ठिकाण माहीत नसतानाही ते नेमके ज्या विवरात देवी होती तिथे गेले आणि तिकडे त्यांनी खणून आईची मूर्ती बाहेर काढली अशा रीतीने दृश्य स्वरूपात देवी बाहेर आली. सध्या देवी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तिची विधीपूर्वक स्थापना करून प्राणप्रतिष्ठा केली गोपाळ पंथी नानांनी पुढाकार घेऊन लोकांच्या मदतीने लहानसे मंदिर बांधले पुढे सोळाव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत या देवळाचा जीर्णोद्धार केला. ते मंदिर तेव्हापासून आजपर्यंत आहे त्या स्थितीत आहे. जागेवर स्वतः बसून राम-लक्ष्मणाचा बचाव केला राम-लक्ष्मणांनी हनुमंताच्या साह्याने अहिरावण आणि महिरावणाचा निपात करून लंकेत प्रयाण करण्यापूर्वी ते कदलिवह म्हणजे आजचे केळवे या गावी सागर किनाऱ्यावर विश्रांतीसाठी थांबले शिवभक्त राम शिवाला अभिषेक घातल्याशिवाय मार्गस्थ होणार नव्हते. त्यांनी आपला बाण काढून धनुष्याच्या साह्याने समोरच्या जमिनीवर मारताच तिथे एक सुंदर तलाव निर्माण झाला त्यालाच आज रामकुंड म्हणून ओळखले जाते. अशी आख्यायिका या रामकुंडाची आहे.
भवानी शंकर वाळूकेश्वर : प्रभू रामचंद्र त्या तिथे कुंडाच्या समोर ध्यानस्थ झाले त्या त्यांच्या तपश्चर्येतून हळूहळू शिवलिंग वाळूतून गंगेसह पृथ्वीवर उतरले वाळूतून निर्माण झालेले हे स्वयंभू शिवलिंग फक्त भारतात एकच आहे म्हणून त्यास भवानी शंकर वाळूकेश्वर ही संज्ञा प्राप्त झाली. या शिवलिंगावर अभिषेक करून प्रभू रामचंद्र ने त्याची शास्त्रोक्त पूजा केली लिंगातून वाहणाऱ्या पवित्र गंगेचे पाणी प्राशन करून त्यांनी लक्ष्मणासह पवनसुताच्या साह्याने लंकेश गमन केले अशी आख्यायिका या वाळूकेश्वर शिवलिंगा बाबत आहे.
मोठ्या संख्येने भक्तगण : शितलादेवी हे जागृत देवस्थान आहे. नवरात्री मध्ये गुजरात मुंबई ते कोकणातील भक्तगण इथे दर्शनासाठी येत असतात. दोन वर्ष नवरात्रीचा उत्सव कोरोनामुळे साजरा करता आला नाही मात्र यावर्षी मोठ्या संख्येने भक्तगण दर्शनासाठी येतील असे वाटत आहे. या काळात कुठलीही गडबड गोंधळ होऊ नये याकरिता शितलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.