पालघर - डॉ. पायल तडवी या विद्यार्थीनीस आत्महत्येस प्रवृत्त्त करणाऱ्या दोषी डॉक्टरांवर लवकर काठोरात-कठोर कारवाई व्हावी, या माागणीसाठी आज श्रमजीवी संघटनेच्यावतीने पालघर तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. पायलला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करावी; श्रमजीवी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - रॅगिंग
मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये डॉ.पायल तडवी या आदिवासी विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस प्रवृत्त्त करणाऱ्या दोषी डॉक्टरांवर लवकर काठोरात-कठोर कारवाई व्हावी, या माागणीसाठी आज श्रमजीवी संघटनेच्यावतीने पालघर तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला.
डॉ.पायल तडवी नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती. २२ मे रोजी रुग्णालयाच्या परिसरातच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रुग्णालयातील ३ वरिष्ठ डॉक्टरांनी जातीयवादी टीका करून पायलचे रॅगिंग केल्याचा आरोप पायलच्या कुटुंबीयांनी केला.
त्यामुळे याप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या तीनही महिला डॉक्टर फरार असून पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी करून आरोपीला अटक करण्याची श्रमजीवी संघटनेने केली आहे. यावेळी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होऊन या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.