पालघर - वसईच्या नायगाव पूर्वेकडील परिसरातील एका हायप्रोफाइल रहिवासी संकुलातील पुरुष व महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या प्रसंगाचे चित्रीकरण उपस्थितांमुळे समोर आले आहे. अद्याप भांडणाचे मुख्य कारण स्पष्ट नसून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
नायगावमध्ये हायप्रोफाइल संकुलात तुफान हाणामारी... महिलांंमध्येही खडाजंगी! - palghar crime news
दोन दिवसांपूर्वी नायगाव परिसरातील नर्मदा नक्षत्र या सोसायटीमधील पटेल व हेरला कुटुंबीयांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्याचे रुपांतर थेट हाणामारीत होऊन एका व्यक्तीने थेट दगडाने डोके फोडण्याचा प्रयत्न केला. या भांडणात दोन्ही कुटुंबातील महिलांचा सहभागही होता. बातमीतील व्हिडिओतून त्याची तीव्रता स्पष्ट होते.
दोन दिवसांपूर्वी नायगाव परिसरातील नर्मदा नक्षत्र या सोसायटीमधील पटेल व हेरला कुटुंबियांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्याचे रुपांतर थेट हाणामारीत होऊन एका व्यक्तीने थेट दगडाने डोके फोडण्याचा प्रयत्न केला आहे. अखेर रक्तबंबाळ व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. या भांडणांमध्ये दोन्ही कुटुंबातील महिलांचा सहभागही होता. बातमीतील व्हिडिओतून त्याची तीव्रता स्पष्ट होते.
चित्रपटांमध्ये दाखवली जाते, अशा प्रकारची हाणामारी या सोसायटीत झाली. चित्रीकरणात महिला एकममेकींना पाडत असल्याचे दिसते. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन रहिवाशांमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होतोय.