पालघर : काशिमिरा वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार(५५) यांचा बुधवारी करोनामुळे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काशिमिरा वाहतूक शाखेच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकाचा करोनाने मृत्यू
काशिमिरा वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, या शाखेच्या आणखी ३ अधिकारी, २ कर्मचारी व एका ट्रॅफिक वॉर्डनलादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती आहे.
पवार यांना काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर पवार व त्यांच्या पत्नीला करोनाची लागणं झाल्याचे वैद्यकीय अहवाल स्पष्ट झाले होते. मात्र, बुधवारी पहाटे अनिल पवार यांचा मृत्यू झाला तर, पत्नीवर अद्याप मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासोबत काशिमिरा वाहतूक शाखेच्या आणखी ३ अधिकारी, २ कर्मचारी व एका ट्रॅफिक वॉर्डनलादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, पालघर पोलीस ठाण्यातील 4 पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.