पालघर/वसई - वसई विरारमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला. पहिला रूग्ण ज्या परिसरात आढळला त्याच परिसरात दुसरा रुग्णही आढळला. दुसरा रुग्ण हा दुबईवरून तीन ते चार दिवसांपूर्वी आला होता. त्याला लक्षणे जाणवू लागल्याने तो खासगी रुग्णवाहिकेने कस्तुरबा येथे तपासणी गेला होता. चाचणी अहवालात त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
वसई-विरारमध्ये करोनाचा आढळला दुसरा रुग्ण - कोरोना बातमी मुंबई
पहिला रूग्ण ज्या परिसरात आढळला त्याच परिसरात दुसरा रुग्णही आढळला. दुसरा रुग्ण हा दुबईवरून तीन ते चार दिवसांपूर्वी आला होता.
वसई-विरारमध्ये करोनाचा आढळला दुसरा रुग्ण
त्यामुळे आता वसई-विरारमध्ये रुग्णांची संख्या दोनवर पोहचली आहे. पहिला रुग्ण सिडनीमधून आला होता. त्याच्या कुटुंबातील इतरांच्या चाचण्या झाल्या असून त्यात कोणीही बाधित आढळला नाही. दुसऱ्या रुग्णाचे नातेवाईकसुद्धा कस्तुरबाला दाखल झाले असून त्यांच्या तपासण्या सुरू आहेत. तसेच तो इतक्या दिवसात कुणाच्या संपर्कात आला याचा शोध सुरू असून ज्या रुग्णवाहिकेने गेला त्याच्या चालकाची तपासणीसुद्धा सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.