महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाळकरी मुलगा तिवसपाडा पुरात गेला वाहून - खूदेड कुंडाचा पाडा

विक्रमगड येथील खूदेड कुंडाचा पाडा मधील इयत्ता दहावीत शिकणारा मुलगा तिवसपाडा पुरातवाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळची घडली. सीताराम शिवराम चौधरी असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. सीताराम साखरा येथील छत्रपती हायस्कुलमध्ये शिकत होता.

शाळकरी मुलगा तिवसपाडा पुरात गेला वाहून

By

Published : Aug 3, 2019, 7:06 PM IST

पालघर(वाडा)-विक्रमगड येथील खूदेड कुंडाचा पाडामधील इयत्ता दहावीत शिकणारा मुलगा तिवसपाडा पुरात गेला वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळची घडली. घटनेची माहिती कळताच विक्रमगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीताराम शिवराम चौधरी असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे.

सीताराम साखरा येथील छत्रपती हायस्कुलमध्ये शिकत होता. सायंकाळी घरी परतत असताना पुरात वाहून गेल्याने तो बेपत्ता झाला होता. नदी काठी शाळेची बॅग सापडल्याने गावकऱ्यांनी सीतारामचा शोध सुरू केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details