पालघर - लॉकडाऊनच्या काळात गरीबांचे अन्नासाठी हाल झाले. यादरम्यान अनेक ठिकाणी विविध माध्यमांतून गरजूंना मदत पुरवण्यात येत आहे. ठिकठिकाणी समाजसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, समाजसेवक तसेच अन्य व्यक्तींनी पुढाकार घेतला. असाच उपक्रम घासकोपरीतील संयुक्त मित्र मंडळाच्या वतीने राबवण्यात आलाय. मंडळाच्या पुढाकाराने अन्नधान्य वाटप करण्यात आले. या मंडळातर्फे दररोज पंधराशेहून अधिक गरजूंना जेवण देण्यात येते.
विरारमध्ये संयुक्त मित्र मंडळाचा मदतीचा हात; दररोज पंधराशेहून जास्त गरजूंना अन्नवाटप - food donation in palghar
अनेक ठिकाणी विविध माध्यमांतून गरजूंना मदत पुरवण्यात येत आहे. ठिकठिकाणी समाजसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, समाजसेवक तसेच अन्य व्यक्तींनी पुढाकार घेतला. असाच उपक्रम घासकोपरीतील संयुक्त मित्र मंडळाच्या वतीने राबवण्यात आलाय. मंडळाच्या पुढाकाराने अन्नधान्य वाटप करण्यात आले. या मंडळातर्फे दररोज पंधराशेहून अधिक गरजूंना जेवण देण्यात येते.
ठिकठिकाणी अडकलेल्या गरजूंच्या हाताला काम नसल्याने त्यांची अन्नासाठी वणवण सुरू आहे. त्यातच लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने त्यांच्या अडचणीत भर पडलीय. अशा वेळी प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात येत असल्याची माहिती संयुक्त मंडळाचे किसन पाटील यांनी दिली.
लॉकडाऊन आज-उद्या उठेल या आशेवर अनेक मजूर, कामगार विरार परिसरात अडकून पडले आहेत. त्यांना मायदेशी परतण्याची हुरहूर लागलीय. मात्र, शासनाच्या नियमांनुसार त्यांना घरी परतताना अडथळे येत आहेत. अशातच त्यांच्याकडील पैसे संपल्याने अन्नासाठी वणवण होत आहे. या परिस्थितीत मंडळाच्या उपक्रमाने या मजूरांना दिलासा मिळालाय.