वाडा (पालघर) - पालघर जिल्ह्यातील डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात सॅनिटायझरयुक्त फवारणी यंत्र प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आले आहे. तसेच, मास्क आणि अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे एपीआय राहुल पाटील यांनी बोलताना सांगितले.
डहाणू पोलीस ठाण्यात सॅनिटायझरयुक्त फवारणी यंत्र - sanitizer
सॅनिटायझरयुक्त फवारणी यंत्र पोलिस स्टेनागरिकांच्या सेवेबरोबरच पोलिसांचीही आरोग्य विषयक सुरक्षेची जबाबदारी महत्त्वाची मानली जाते, म्हणून डहाणू पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वार जवळच सॅनिटायझरची फवारणी करणारे यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्राद्वारे हाताचे निर्जंतुकीकरण होत आहे. शन आवारात
![डहाणू पोलीस ठाण्यात सॅनिटायझरयुक्त फवारणी यंत्र डहाणू पोलीस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6751295-450-6751295-1586600092025.jpg)
सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने लाॅकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. यावरही नागरिक गर्दी करताना दिसतात. नागरिकांच्या सेवेबरोबरच पोलिसांचीही आरोग्य विषयक सुरक्षेची जबाबदारी महत्त्वाची मानली जाते, म्हणून डहाणू पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वार जवळच सॅनिटायझरची फवारणी करणारे यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्राद्वारे हाताचे निर्जंतुकीकरण होत आहे.
त्याचप्रमाणे डहाणू व पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सूचित केल्यानुसार मास्क वापरणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी एपीआय राहुल पाटील यांनी बोलताना माहिती दिली.