पालघर - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या कठीण काळातदेखील कडक उन्हात रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन सुविधा सुरू करण्यात आली आहे. 24 तास बंदोबस्त करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, वेळोवेळी निर्जंतुकीकरण व्हावे म्हणून पालघर पोलीस प्रशासनातर्फे सॅनिटायझेशन व्हॅन सुविधा सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझेशन व्हॅन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझेशन व्हॅनची सुविधा करण्यात आली आहे. 24 तास बंदोबस्त करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण व्हावे, यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझेशन व्हॅन
यामध्ये ६ ते ७ सेकंद उभे राहिल्यास संपूर्ण शरीराचे निर्जंतुकीकरण होते. ही मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी फिरणार आहे.