महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समेळ पाडा स्मशानभूमीत धोकादायक स्थितीत होत आहेत अंत्यसंस्कार; मोठ्या दुर्घटनेची भीती - mns

याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधीतांना पत्र दिले होते. मात्र तरीदेखील या प्रकरणी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. सदरील स्मशानभूमी नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाडा येथे आहे. या स्मशानभूमीतील भिंत्यांना आणि पिलरला भेगा पडल्या आहेत. स्मशानभूमीत लाखो रुपये खर्च करून विद्युत दाहिनी बसविण्यात आली होती. मात्र तिची अवस्था देखील बिकट असल्याचे समजले आहे.

समेळ पाडा स्मशानभूमी

By

Published : Aug 27, 2019, 11:36 PM IST

पालघर- वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील समेळपाडा येथील स्मशानभूमी धोकादायक झाली आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र प्रशासनाकडून याप्रकरणी दुर्लक्ष होत आहे.

माहिती देताना मनसे शहर उपाध्यक्ष संजय मेहरा

याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधीतांना पत्र दिले होते. मात्र तरीदेखील या प्रकरणी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. सदरील स्मशानभूमी नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाडा येथे आहे. या स्मशानभूमीतील भिंत्यांना आणि पिलरला भेगा पडल्या आहेत. स्मशानभूमीत लाखो रुपये खर्च करून विद्युत दाहिनी बसविण्यात आली होती. मात्र तिची अवस्था देखील बिकट असल्याचे समजले आहे.

वसई विरार महानगरपालिकेने २०१४ साली विद्युत दाहिनी बसवून लाखो रुपयांचा खर्च केला आहे. या दाहिनीत १८५ मृतदेहांचे दहन केले असून सध्या तिची अवस्था बिकट आहे. या दहिनीच्या ऑपरेटरला आद्याप पगार दिला नसल्याची माहिती मिळाली आहे. मनसेच्या पाठपुराव्यानंतर नवीन शेड बांधली असली तरी ती निकृष्ठ असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. येथील अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details